22 year old woman gangraped at shakur basti railway station platform in delhi
नवी दिल्ली : दिल्लीतील शकूर बस्ती रेल्वे स्थानकाच्या परिसरात महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला २२ वर्षीय असून तिच्यावर तिघांनी अत्याचार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या परिसरात राहते. आपल्या कुटुंबासोबत तिचा वाद झाल्यानंतर ती रागाने घरातून निघून आली आणि रेल्वे स्थानकात बसली होती. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, रेल्वे स्थानकात एकटी बसल्याचं पाहून तिघेजण तिच्याजवळ आले. त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. त्यांना विरोध केला तेव्हा तिला रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या झुडपात खेचत नेलं आणि सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कार केल्यावर तिन्ही आरोपींनी पीडित महिलेला धमकावले की, जर पोलिसांत तक्रार दाखल केली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आणि वैद्यकीय अहवाल आल्यावर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…