देश

जम्मूत बसमध्ये स्फोट झाल्याने 2 जण जखमी, भारतीय लष्कराच्या चेकिंग पॉईंटसमोर घडली घटना

जम्मू काश्मीर : जम्मूच्या उधमपूर जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा एका बसमध्ये झालेल्या स्फोटामुळे खळबळ उडाली. या स्फोटात २ जण जखमी झाले आहेत, तर या बसच्या आसपास उभ्या असलेल्या इतर वाहनांचेही नुकसान झाले आहे. या स्फोटामागे दहशतवादी अँगल असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जम्मूच्या उधमपूर जिल्ह्यातील डुमेल चौक स्फोटाच्या आवाजाने हादरला. चौकाजवळील पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या बसमध्ये हा स्फोट झाला. या पेट्रोल पंपासमोर भारतीय लष्कराचा चेकिंग पॉईंटही आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज इतका जोरदार होता की संपूर्ण उधमपूर शहर या आवाजाने हादरले. या स्फोटात बसचे आणि पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. या स्फोटानंतर हा परिसर पोलिसांनी सील केला असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

तपास सुरु, दहशतवादी कोन असण्याची शक्यता
उधमपूर रेंजचे डीआयजी मोहम्मद सुलेमान चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहा वाजता हा स्फोट झाला. त्यांनी सांगितले की, ही बस बसंतगडहून उधमपूरला आली होती आणि 6 वाजल्यापासून पेट्रोल पंपावर उभी होती. त्यांच्या म्हणण्यानुसार बस दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बसंतगडहून निघणार होती, पण त्याआधीच तिच्यात स्फोट झाला. मोहम्मद सुलेमान चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, या स्फोटाचा तपास सुरू असून सध्या या स्फोटाबाबत काहीही बोलणे योग्य होणार नाही. मात्र, त्यांनी स्फोटात दहशतवादी कोन असण्याची शक्यता नाकारली नाही. स्फोटात दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या स्फोटाची छायाचित्रे पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली असून, पोलिसांनी पेट्रोल पंपाचा डीव्हीआर ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर या बसच्या चालक आणि वाहकाचीही पोलीस चौकशी करत आहेत. काही काळापासून उधमपूरमध्ये दहशतवादी कारवाया सातत्याने वाढत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago