देश

तरुणीकडून अल्पवयीन मुलावर वारंवार बलात्कार, पॉक्सो कायद्यांतर्गत न्यायालयाने ठोठावली शिक्षा

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. येथे बलात्काराप्रकरणी एका मुलीला दोषी ठरवण्यात आले असून न्यायालयाने या मुलीला तब्बल 10 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. ‘पॉक्सो कायद्यांतर्गत केवळ पुरुषच नव्हे तर महिलाही दोषी ठरू शकते,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरच्या बाणगंगा भागात राहणाऱ्या 19 वर्षीय मुलीने एका 16 वर्षीय मुलाचे शारीरिक शोषण केले. या मुलीवर अल्पवयीन मुलाला फूस लावून गुजरातला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. तिथे या मुलीने मुलाला टाइल्सच्या कारखान्यात कामावर लावले. तसेच मुलाला स्वतःशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. तिने प्रदिर्घ काळापर्यंत या अल्पवयीन मुलाचे शारीरिक शोषण केले.

5 नोव्हेंबर 2018 रोजी बाणगंगा भागात राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिने म्हटले होते की, तिचा मुलगा दूध आणण्यासाठी गेला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता मुलाचे लोकेशन गुजरातमध्ये आढळले. पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन मुलाचा शोध घेतला. तिथे त्याच्यासोबत 19 वर्षीय मुलगीही राहत असल्याचे त्यांना आढळले. मुलीने भाड्याने घर घेतले होते. त्यात ती मुलासोबत एकत्र राहत होती.

पोलिसांनी अल्पवयीन मुलाची चौकशी केली असता त्याने सांगितले की, राजस्थानमधील एका १९ वर्षीय तरुणीने त्याला फूस लावून गुजरातला नेले होते. जेथे तिने त्याला टाइल्स कारखान्यात कामावर लावले होते. ती मुलगी त्याला वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती. अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितले की, मुलगी त्याचा मोबाईल आपल्याकडे ठेवायची. जेणेकरून तो त्याच्या आई-वडिलांशी बोलू शकणार नाही. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक करून तिच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा फिर्यादी अधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले की, मुलगी स्वतः एका अल्पवयीन मुलासोबत भाड्याच्या घरात राहायची आणि त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकायची. पोलिसांनी तपास केला असता तरुणीवर केलेले आरोप बरोबर असल्याचे आढळून आले. पॉक्सो कायद्यांतर्गत मुलीला शिक्षा सुनावण्यात आलेली ही पहिलीच घटना असल्याचे जिल्हा अभियोक्ता अधिकाऱ्यांनी सांगितले.

पॉक्सो कायद्यांतर्गत 10 वर्षांची शिक्षा

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणीला अटक करून तिच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर झालेल्या तपासात मुलाने केलेले सर्व आरोप खरे सिद्ध झाले. मुलाचे प्रदिर्घ काळापर्यंत लैंगिक शोषण झाले होते. एखाद्या मुलीवर बलात्काराचा आरोप झाल्याचे हे बहुदा देशातील पहिलेच प्रकरण आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत न्यायालयाने आरोपी तरुणीला 10 वर्षांची शिक्षा व 3 हजार रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago