देश

दुर्दैवी : स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान १७ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रविवारी मोठा अपघात झाला. येथील मुरादनगर मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान छत कोसळल्याने अनेक लोक मलब्याखाली दाबले गेले. यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले आहेत. पाऊस आल्याने ते सर्व लोक छताखाली उभे राहिले होते. ज्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार चालू होते, त्याचा मुलगा देखील यामध्ये मृत्युमुखी पडला.

NDRF ची टीम बचावकार्य करत आहे, परंतु पावसामुळे अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. मृतांमध्ये 3 जणांची ओळख पटली आहे. योगेंद्र, बंटी आणि ओंकार अशी त्यांची नावे होती. ते संगम विहार आणि मुरादनगर येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबातील व्यक्तींना दोन-दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

दयानंद कॉलनी येथील ६५ वर्षीय दयाराम यांचे शनिवारी रात्री आजाराने निधन झाले. रविवारी मुरादनगर स्मशानभूमीत 100 हून अधिक लोक अंतिम संस्कार करण्यासाठी जमले होते. पाऊस आल्यामुळे लोक छोट्याशा गॅलरीत उभे होते. अचानक या गॅलरीचं छत कोसळल्याने हा अपघात झाला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago