महाराष्ट्र

महाराष्ट्रात नव्या दलित चेहऱ्याचा उदय; आझाद समाज पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

मुंबई : युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष राहुल प्रधान यांची आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला नवीन दलित चेहरा मिळाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला एक सक्षम आणि कणखर आंबेडकरी युवा नेतृत्व दिलं असल्याच्या भावनाही युवकांमधून उमटू लागल्या आहेत.

राहुल प्रधान हे मरावाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतील अग्रणी नेते एस एम प्रधान यांचे चिरंजीव आहेत. राहुल प्रधान यांनी यापूर्वी युवा पँथरच्या माध्यमातून दलित युवकांना संघटित करण्यास सुरवात केली होती. आता ते समाज पार्टीच्या माध्यमातून दलित युवकांशी जोडले जाणार आहेत.

राज्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिक पक्षाचे रामदास आठवले यांच्यानंतर नव्या दलित चेहऱ्याचा उदय झाला आहे. आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी प्रधान यांना नियुक्ती पत्रक दिले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर राहुल प्रधान यांनी चंद्रशेखर आझाद यांचे आभार मानले असून त्यांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भीम आझाद पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी नुकतीच भीमा कोरेगावला भेट दिली होती. त्यांनी महाराष्ट्राचा तीन दिवसीय दौरा त्यावेळी केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाचा अंदाज घेतला. येणाऱ्या काळात उत्तरप्रदेशनंतर आझाद यांची महाराष्ट्रवर नजर राहणार आहे. येणाऱ्या काळातील निवडणुकांकडे ते कसे पाहतात याची उत्त्सुकता आता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago