आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झालीय. परंतु, यापूर्वीच लोकसभेचे १७ खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून संसद भवनात या सर्व खासदारांची १३ आणि १४ सप्टेंबर रोजी करोना चाचणी करण्यात आली होती.
करोना संक्रमित खासदारांमध्ये सर्वाधिक १२ खासदार सत्ताधारी भाजपचे, वायआरएस काँग्रेसचे दोन, शिवसेना, डीएमके आणि राष्ट्रीय जनता दलाच्या एका-एका खासदाराचा समावेश आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३५९ सदस्यांनी लोकसभेच्या कामकाजाला हजेरी लावल्याचं सांगण्यात आलंय.
खासदार मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे आणि प्रवेश साहिब सिंह वर्मा यांच्यासहीत एकूण १७ खासदार करोना पॉझिटिव्ह आढळलेत. यामध्ये सुखबीर सिंह, प्रताप राव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी, प्रताप राव पाटील, रामशंकर कठेरिया, सत्यपाल सिंह यांचाही समावेश आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…