चीननं गलवान खोऱ्यात आगळीक केल्यानंतर या तणावाच्या वातावरणातच भारतानं ५९ चिनी अॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा एकद चिनी अॅपचा मुद्दा चर्चेत आला आहे. आणि याला कारणही भाजपाच ठरली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोमु वीर्राजू यांची आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीचं पत्र सोशल मीडियावर टाकण्यात आलं. मात्र हे पत्र CamScanner या चिनी अॅपनं Scan केलेलं आहे. या पत्राच्या शेवटी तसा उल्लेखही दिसून येतो. ही चूक नेटकऱ्यांनी लक्षात आणूण देताच भाजपानं ट्विट डिलीट केलं. मात्र, तोपर्यंत CamScanner या चिनी अॅपनं Scan केलेलं हे पत्र सगळीकडे व्हायरल झालं होतं. सध्या ट्विटरवर भाजपाला यावरून ट्रोल केलं जात आहे.
एक नेटकऱ्यांनं असं म्हटलं आहे की, “CamScanner या चिनी अॅपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. पण सत्ताधारी पार्टीच त्याचा कार्यालयीन कामासाठी वापर करत आहे. त्यांनी हे अॅप काढून टाकलेलं नाही.” तर एकानं AdobeScan वापरण्याचा सल्ला दिला आहे.
या पत्रामुळे ट्विटरवर नेटकऱ्यांनी भाजपावर निशाणा साधला असून, टीकेबरोबरच सल्लेही दिले जात आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…