डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांना करोनाची लागण

अमेरिकेत कोरोनाचं थैमान असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला करोनाची लागण झाली आहे. सीएनएनने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांना करोनाची लागण झाली असल्याचं वृत्त दिलं. पहिल्यांदाच ट्रम्प प्रशासनातील उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट ओ’ब्रायन यांच्यात शेवटची भेट कधी झाली होती हे अद्याप स्पष्ट नाही. १० जुलैला दोघे एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. रॉबर्ट ओ’ब्रायन यांना करोनाची लक्षणं दिसत असून त्यांनी स्वत:चं विलगीकरण केलं आहे. राष्ट्रीय परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांमधूनच आपल्याला रॉबर्ट ओ’ब्रायन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं आहे.

रॉबर्ट ओ ब्रायन काही दिवसांपूर्वी युरोपमधून परतले होते. तिथे त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी युके, फ्रान्स, जर्मनी आणि इटलीमधील काही अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत सिक्रेट सर्व्हिस एजंट, स्टाफ आणि अनेक रिपोर्टर्स उपस्थित होते. त्यांचे अनेक फोटोही प्रसिद्ध झाले होते ज्यामध्ये ते सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचं तसंच मास्कचाही वापर करत नसल्याचं दिसत होतं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago