पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत उदयनराजे भोसले यांची रोखठोक प्रतिक्रिया…

मुंबई : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, भारतात लोकशाही आहे. लोकशाहीत आपण मतदार प्रतिनिधींची निवड करत असतो. त्यामुळे प्रतिनिधींनी जबाबदारीचं भान ठेवून वागायला हवं. पूजा चव्हाण प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला हवी. कायद्या समोर सर्वजण समान असतात. उदयनराजे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घ्यायला आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

उदयनराजे भोसले म्हणाले कि, “राजेशाही जाऊन आता देशात लोकशाही आली आहे. लोकशाहीत आपण आपले प्रतिनिधी निवडून देत असतो. आपल्या मतांवर आमदार, खासदार निवडून येतात. त्यामुळे अशा नेत्यांनी जबाबदारीचं भान ठेवून वागायला आणि बोलायला हवं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात जर संबंधित व्यक्ती जबाबदार असेल तर तत्काळ त्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी. त्याठिकाणी उदयनराजे असतील तरी कारवाई ही व्हायलाच हवी. कायद्यासमोर सर्वजण समान असतात.”

राज ठाकरेंच्या भेटीचं कारण विचारलं असता उदयनराजे म्हणाले, “आमच्या घरात लवकरच एक लग्न आहे. त्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत जवळपास 1 तास राज ठाकरे यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या. सध्या पत्रिका देण्याच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी मी घेत आहे.”

मराठा आरक्षणाबाबत उदयनराजे म्हणाले की, “मराठा आरक्षण प्रश्नी कोणत्याही प्रकारचे राजकारण होऊ नये अशी विनंती मी शरद पवार यांना केली आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला मी स्वतः तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण आणि समितीतील सदस्य देखील उपस्थित असतील. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात सरकार कोणती रणनीती अवलंबणार आहेत याबाबत चर्चा होणार आहे. मराठा समाजाची मागणी रास्त आहे. इतर समाजाला ज्या पद्दतीने आरक्षण मिळालं त्याच पद्यतीने मराठा समाजाला देखील आरक्षण मिळावं अशी माझी इच्छा आहे.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago