मनोरंजन

महिला कलाकारांनी माझं शोषण केलं; अभिनेत्यानं केला धक्कादायक खुलासा

मुंबई: अभिनेता अजफर रहमान नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यानं त्याच्या या प्रवासाविषयी सांगितलं तसेच अभिनय क्षेत्रात काम करताना आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांबद्दलही अनेक खुलासे केले आहेत. मी टू चळवळीसारख्या विषयावरही त्यांनी भाष्य केलं.

अभिनेता अजफर रहमान म्हणाला कि , मी टू हा खूपच संवेदनशील विषय आहे. कोणत्याही व्यक्तीचं अशाप्रकारे शोषण होणं ही चुकीची गोष्ट आहे. सर्वांनाच जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने स्वतःला वाटतं तसं जगावं पण याचा अर्थ असा नाही होत की, तुम्ही त्यासाठी कोणावरही जबरदस्ती कराल. कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय तुम्ही त्या व्यक्तीकडून जबरदस्तीनं एखादी गोष्ट करून घेऊ शकत नाही. या मुलाखतीत अजफरनं त्याचंही शोषण झाल्याचा धक्कादायक खुलासा केला. अनेक पीडितांना त्यानं पाठिंबा दिला मात्र त्याच्या मते तो अशा अनेकांना ओळखतो ज्यांनी मी टू चळवळीचा उपयोग चुकीच्या पद्धतीनं केला आहे.

अजफर पुढे बोलताने म्हणाला कि मला नाही माहीत की सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीबद्दल खुलासा करणं कितपत योग्य आहे. पण एक पुरुष कलाकार असताना काही महिला सहकलाकारांनी माझं शोषण केलं आहे. मी या ठिकाणी कोणचंही नाव घेणार नाही. कारण आता अशा गोष्टींकडे मी दुर्लक्ष करायला शिकलो आहे. पण नेहमी स्त्रियाच बरोबर असतातच असं नाही. मी आणि माझ्यासोबत अनेक कलाकारांनी एका मर्यादेपलिकडे जाऊन काम करण्याची इच्छा होती. बॉलिवूडच्या काही भूमिकांसाठी मला ऑडिशन देण्यास सांगण्यात आलं. पण सर्व ऑडिशनमध्ये मला नकार मिळाला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago