Sharad Pawar
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना व्हॉट्सऍपवर धमकी आली आहे. शरद पवार यांना धमकी मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन याबाबत तक्रार केली. शरद पवार यांना धमक्या मिळाल्याची माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी एका वेबसाईटच्या माध्यमातून धमक्या दिल्याचं म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनाही कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. शरद पवार यांना मिळालेल्या धमकीबाबत त्यांनी हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच हे राजकारण थांबायला हवे, असेदेखील म्हटले आहे. यावेळी पोलिसांकडून न्याय मागण्यासाठी मी येथे आले असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या वडिलांना काही इजा झाली तर त्याला गृह मंत्रालय जबाबदार असेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी पोलिसांकडे न्यायासाठी आवाहन केले, तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली.
शरद पवार यांच्याबाबत व्हॉट्सऍपवरवरील धमकीच्या संदेशात काय आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याबाबत सुप्रिया सुळे किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर पवारांना मिळालेली धमकी राजकीय असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…