brutally murdered
वाशिम : जन्मदात्या पित्याने जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात आरोपीची पत्नी व १० वर्षाचा दुसरा मुलगा देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाशिम मध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ७ तारखेला मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील इचुरी गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नंदू आत्माराम घोडके हा व्यसनी होता. त्यामुळे त्याचे वृद्ध वडील आत्माराम घोडके यांनी जमीन त्याच्या नावावर न करता आपल्या दोन नातवांच्या नावावर केली होती. आत्माराम यांनी आरोपी नंदूचा मुलगा हरिओम घोडके व दुसरा वारसदार म्हणून मुलीच्या मुलाच्या नावे जमीन नोंदवली होती. यावरून नंदू घोडके हा दारू पिऊन वडील, पत्नी व मुलाशी नेहमी वाद घालायचा. ६ तारखेला संध्याकाळी असाच वाद झाला. त्यानंतर नंदूने रात्री साडेबारा वाजता पुन्हा वाद घालत पत्नी रेखा घोडके, मुलगा हरिओम घोडके, लहान मुलगा महादेव घोडके यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले.
दरम्यान, आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले, त्यांना पाहून नंदूने तिथून पळ काढला. शेजाऱ्यांनी तात्काळ तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मोठा मुलगा हरिओम घोडके याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अकोला येथे दुसरे हॉस्पिटल रेफर करण्यात आले होते. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर १0 वर्षाचा दुसरा मुलगा महादेवच्या डोक्याला मार लागला आहे. तो प्रचंड घाबरलेला आहे. आसेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून आरोपीचा शोध सुरु आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…