rain in the state
पुणे : अंदमान बेटाच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. परिणामी राज्यात २३ ते २८ सप्टेबर या काळात दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंदमान बेटाच्या उत्तर भागात आज हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दक्षिण राजस्थानमधून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास २३ सप्टेबरपासून सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, अंदमान मधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रातून पावसाच्या परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण होणार आहे. सध्या तरी राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्यास अनुकूल वातावरण नाही. २३ ते २८ सप्टेबर, या काळात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…