नाशिक

नाशिक : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, पालकांनी केला गंभीर आरोप

नाशिक : के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात अस्मिता संदीप रौदळ-पाटील (वय १८) या विद्यार्थिनीने मुलींच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अस्मिता अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मृत मुलीच्या पालक व नातेवाईकांनी वसतिगृहाबाहेर थांबून यासंबंधी जाब विचारला. त्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली.

अस्मिताच्या वडिलांचा सटाण्यात शेती व ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तिची आई गृहिणी आहे. अस्मिताला एक १५ वर्षांची बहीण व १० वर्षांचा लहान भाऊ आहे. अस्मिता दोन दिवसांपूर्वी तिच्या घरी आई वडिलांना भेटून महाविद्यालयात दाखल झाली होती. नातेवाईकांनी सांगितले की ती अत्यंत हुशार, शांत व सोज्वळ स्वभावाची होती आणि ती असे टोकाचे पाऊल उचलू शकत नाही.

अस्मिताच्या आत्महत्येमागे काहीतरी वेगळे कारण असल्याची शक्यता व्यक्त करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच वसतिगृहाच्या महिला रेक्टर माहिती लपवत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. महाविद्यालय व्यवस्थापनाने घटना घडल्याची माहिती अस्मिताच्या आई-वडिलांना न देता नातेवाईकांना का दिली? पोलिसांना घटनास्थळी दाखल होऊ न देता मृतदेह परस्पर जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी का पाठवला? असे प्रश्न विचारल्यावर महाविद्यालय प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, रेक्टरला पोलीस अटक करीत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली.

वसतिगृहाबाहेर शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत पालक व नातेवाईक थांबून राहिले होते. वसतिगृहाच्या बाहेर गर्दी वाढल्याने पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. मृतदेह रूमच्या बाहेर काढते वेळी हॉस्टेल प्रशासनाने पोलिसांना कळवणे गरजेचं असताना इतर मुलींच्या साहाय्याने दरवाजा तोडत या मुलीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. रेक्टरवर गुन्हा दाखल न केल्यास बदलापूरसारखं आंदोलन करू, असा इशारा मुलीच्या वडिलांनी प्रशासनाला दिला.

अस्मिताचा मृतदेह विच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला होता. परंतु तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही विच्छेदन होऊ देणार नाही, असे नातेवाईकांनी सांगितले. महाविद्यालय व्यवस्थापनाने परस्पर मृतदेह खाली का उतरवला असा सवालही नातेवाईकांनी उपस्थित केला. अस्मिताने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असावी अशी शक्यता व्यक्त करीत चिठ्ठी गायब करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. दरम्यान नातेवाईकांनी आडगाव पोलिसांकडे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून योग्य ती  कार्यवाही केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago