महाराष्ट्र

नांदेड हादरलं! हसण्याच्या कारणावरुन फळ विक्रेत्याने छाटले तरुणाचे दोन्ही हात

नांदेड : हसण्याच्या कारणावरुन एका फळ विक्रेत्याने तरुणाचे दोन्ही हात छाटल्याची भयंकर घटना समोर आली आहे. नांदेडच्या भाग्यनगर परिसरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असं पीडित तरुणाचं नाव असून मोहम्मद तोहीद हा आरोपी फरार आहे. शहरातील डी मार्ट परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज हा तरुण बुधवारी डी मार्ट परिसरातील आठवडी बाजारात लसूण विक्रीसाठी गेला होता. त्याच्याच शेजारी मोहम्मद तोहीद हा तरुण फळ विक्री करत होता. यावेळी हसण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा वाढला की, आरोपी मोहम्मद तोहीद याने बाजारातून कोयता खरेदी केला आणि दुपारी चार वाजेच्या सुमारास मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज याचे मनगटापासून दोन्ही हाथ कोयत्याने छाटले. त्यानंतर त्याच्या पायावर आणि पाठीवर कोयत्याने वार केले. या भयंकर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जखमी तरुणाला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनगटापासून तुटलेले हात‎ जोडण्याचे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान‎ होते. मात्र डॉ. मनीष कत्रुवार, सुशांत ‎चौधरी, डॉ. श्रीहरी गुट्टे यांनी तरुणाच्या हातांवर यशस्वी‎ शस्त्रक्रिया करून सहा ‎तासांत दोन्ही हात जोडले.‎

या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी देखील ‎भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत हात‎ छाटल्याची घटना घडली होती.‎ त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago