नागपूर

इंडिगो विमानाच्या पायलटचा बोर्डिंग गेटवरच मृत्यू, नागपूर-पुणे उड्डाणापूर्वी घडली घटना

नागपूर : गुरुवारी नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या उड्डाणाच्या काही वेळापूर्वी विमानाचा पायलट अचानक बेशुद्ध होऊन बोर्डिंग गेटवर पडला. त्यानंतर रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. कॅप्टन मनोज सुब्रमण्यम (वय ४०) असे मृत वैमानिकाचे नाव आहे. दोन दिवसांत भारतातील वैमानिकाच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे.

यासंदर्भात इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘नागपूरमध्ये आमच्या एका वैमानिकाच्या झालेल्या मृत्यूने आम्हाला दु:ख झाले आहे. नागपूर विमानतळावर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांचे दुर्दैवी निधन झाले. आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबासह आणि प्रियजनांसोबत आहेत.

एव्हिएशन वॉचडॉग, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) नुसार, पायलटने बुधवारी पहाटे 3 ते 7 या वेळेत त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर सेक्टरवर दोन उड्डाणे केली होती. पायलटच्या रोस्टरवरून असे दिसून आले की गुरुवारी कामावर हजर होण्यापूर्वी त्याला 27 तासांची विश्रांती मिळाली होती. दुसरीकडे, इंडिगो एअरलाइनने म्हटले आहे की, पायलटने बुधवारी त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर हे दोन सेक्टर चालवले, जे पहाटे (पहाटे 3 ते सकाळी 7 दरम्यान) होते. यानंतर 27 तासांची विश्रांती घेण्यात आली आणि गुरुवारी 04 सेक्टरसाठी दुपारी 1 वाजता सुटण्याचे वेळापत्रक ठरले होते, नागपूरहून त्यांचे पहिले सेक्टर होते.

दोन दिवसात भारतात पायलटच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी कतार एअरवेजचा अनुभवी पायलट बुधवारी प्रवासी म्हणून दिल्लीहून दोहाला जात होता. वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर, फ्लाइट QR 579 मध्येच दुबईला वळवण्यात आली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago