महाराष्ट्र

तरुणाकडून लिव्ह-इन पार्टनरची गोळ्या झाडून हत्या

उत्तर प्रदेश : एका तरुणाने लिव्ह-इन पार्टनरची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीच्या डोक्यात आणि छातीवर गोळी झाडली, असे पोलिसांनी शुक्रवारी (18 ऑगस्ट) सांगितले. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये ही घटना घडली.  ऋषभ सिंग भदौरिया असे या आरोपीचे नाव असून पीडितेचे नाव रिया आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला विधवा होती जी पतीच्या मृत्यूनंतर ऋषभसोबत राहू लागली. सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशन हद्दीतील पॅराडाईज क्रिस्टल अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, गुरुवारी काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला, त्यानंतर ऋषभने रियाची हत्या केली.

या घटनेनंतर आरोपी पोलिसांना शरण आला. पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्ह्यासाठी वापरलेले पिस्तूल जप्त केले. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago