महाराष्ट्र

भीषण अपघात! ताम्हिणी घाटात ५०० फूट खोल दरीत कोसळली थार; सहा तरुणांच्या मृत्यूची शक्यता, बचावकार्य सुरू

रायगड/पुणे : पुण्याहून कोकणात फिरायला निघालेल्या तरुणांचा थार एसयूव्हीसह (MH12 YN 8004) ५०० फूट खोल दरीत पडून भीषण अपघात झाला असून, सहा तरुणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात उघडकीस आला.

उत्तमनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवार, १७ नोव्हेंबर, मध्यरात्रीनंतर घडला असावा. मात्र, तरुणांच्या पालकांनी मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर याबाबत शोधमोहीम सुरू झाली.

गाडीत प्रवास करणारे तरुण :

  1. शहाजी चव्हाण (२२), कोंढवे धावडे, पुणे
  2. पुनीत सुधारक शेट्टी (२०), कोपरे गाव, उत्तमनगर, पुणे
  3. साहिल साधू बोटे (२४), कोपरे गाव, उत्तमनगर, पुणे
  4. श्री महादेव कोळी (१८), कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे
  5. ओंकार सुनील कोळी (१८), कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे
  6. शिवा अरुण माने (१९), कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे)

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे शोध सुरू केला. अखेर गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी ड्रोनच्या मदतीने शोध घेत असताना ताम्हिणी घाटातील एका तीव्र वळणाजवळ दरीत कोसळलेली थार आणि चार मृतदेह आढळले. उर्वरित दोन मृतदेहांचा शोध सुरू आहे.

या मोहिमेत माणगाव पोलीस, रायगड आपत्ती व्यवस्थापन पथक, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती, स्थानिक ग्रामस्थ सक्रिय सहभाग घेत आहेत. परंतु, तीव्र उतार, घनदाट जंगल आणि दरीची प्रचंड खोली यामुळे बचावकार्य अत्यंत धोकादायक ठरत आहे.

प्राथमिक तपासानुसार, ही थार गाडी पुण्याहून कोकणात जाताना कोंडेथर गावाजवळील एका तीव्र वळणावरून घसरून दरीत कोसळली. ताम्हिणी घाटात अशा अपघातांची वारंवार पुनरावृत्ती होते. घाटातील लोखंडी संरक्षणरेलिंग अत्यंत कमजोर आणि अपुरे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बलकवडे, शेलार मामा आणि अंकुश ढमाले यांनी तातडीने प्रबलित सुरक्षा रेलिंग, वेग नियंत्रक, चेतावणी फलक बसवावेत, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. दरीत सापडलेल्या मृतांची अधिकृत ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. उर्वरित मृतदेहांचा शोध सुरू असून बचाव पथक अतिशय कठीण परिस्थितीत कार्यरत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago