Pune: 7-Year-Old Girl Assaulted; Outrage in Area, Safety of Minor Girls Under Question
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावात मंगळवारी संध्याकाळी सात वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित बालिका ऊसतोड मजूर कुटुंबातील असून आरोपी देखील त्याच वस्तीमध्ये राहणारा ऊसतोड कामगार असल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीचे नाव देवीदास रोहीदास गर्जे (वय अंदाजे ३५) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला फुस लावून एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी घाबरलेल्या अवस्थेत घरी परतली आणि तिने आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीने आरोपीचे नाव स्पष्टपणे सांगितल्याने पालकांनी तात्काळ ओतूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पोलिसांची तात्काळ कारवाई
तक्रार मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तत्परता दाखवत काही तासांतच आरोपी देवीदास गर्जेला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करत आहेत. या प्रकरणी आरोपीवर भा.द.वि. कलम ३७६, ३७६(२)(एन), तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पीडित बालिकेवर तातडीने पुण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून वैद्यकीय तपासणीतून पुढील अहवालाची प्रतीक्षा आहे.
परिसरात तणाव
घटनेनंतर ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून शांतता प्रस्थापित केली.
या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही संपूर्ण घटना जिल्ह्यास हादरवणारी असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत प्रशासन आणि पालकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी या जघन्य कृत्याचा तीव्र निषेध करत आरोपीला जलदगतीने कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिस तपास युद्धपातळीवर सुरू असून आरोपीला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…