ठाणे

भिवंडीत शेजारील घराचा भाग कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू, 2 जण जखमी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात रविवारी सकाळी एका शेजारील घराचा भाग कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आणि इतर दोन जण जखमी झालेआहेत, याबाबत नागरी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली.

एका मशिदीच्या शेजारी असलेल्या घरावर एकमजली घराची बाल्कनी कोसळली, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (RDMC) प्रमुख अविनाश सावंत यांनी दिली. शेजारील घराची बाल्कनी ज्या घरावर कोसळली त्या घरातील रहिवासी गुलशन सगीर अन्सारी (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सगीर अन्सारी (४५) आणि मेहताब अन्सारी हे दोघे जखमी झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि आरडीएमसीचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदत आणि बचाव कार्य केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. जखमींना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर उपचारासाठी मुंबईतील वैद्यकीय सुविधेत हलवण्यात आले. स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago