महाराष्ट्र

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावाच्या गाडीला भीषण अपघात, गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ब्रम्हानंद पडळकरांसह तिघेजण गंभीर जखमी आहेत. तसेच छोटा हत्तीचा चालकही गंभीर जखमी आहे. जखमींना विटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला सांगली जिल्ह्यातील विटा-कुंडल रोडवर अपघात झाला. कार्यकर्त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असताना मालवाहू टेम्पो आणि पडळकर यांच्या गाडीचा समोरासमोर धडक झाली.  हा अपघात इतका भीषण होता की, यात ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. तर पिकअप गाडीच्या समोरील भाग चक्काचूर झाला आहे. या अपघातात ब्रम्हानंद पडळकर गंभीर जखमी झाले आहे.

या अपघातात ब्रह्मानंद पडळकर ड्रायव्हर सह तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. ब्रम्हानंद पडळकर यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकअप गाडीतील चालकही जखमी झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे जिल्ह्यातील विटा-कुंडल रोडवर वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे वृ्त्त कळताच आमदार गोपीचंद पडळकर हे आपला सातारा दौरा सोडून विट्याकडे रवाना झाले आहेत. घटनास्थळी विटा स्टेशन पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago