Narendra Modi Modi Address Nation, PM Modi Announced Govt Will Repeal Three Farm Laws
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्गांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारीच ही माहिती दिली. त्यानुसार पंतप्रधान मोदी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यानंतर त्यांचे भाषणही होणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग मोदी राष्ट्राला समर्पित करतील, असे निवेदनात म्हटले आहे.
जारी केलेल्या निवेदनानुसार, कल्याण हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन आहे. देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागातून येणारी वाहतूक कल्याणला जोडते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSTM) च्या दिशेने जाते. कल्याण आणि सीएसटीएम दरम्यानच्या चार रेल्वे मार्गांपैकी, दोन ट्रॅक धीम्या लोकल गाड्यांसाठी आणि दोन जलद लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांसाठी वापरण्यात आले होते. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्या वेगळ्या करण्यासाठी दोन अतिरिक्त मार्गांचे नियोजन करण्यात आले होते.
उल्लेखनीय म्हणजे, MUTP II अंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूर असलेला हा प्रकल्प रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात समान खर्चाच्या वाटणीसह रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) द्वारे कार्यान्वित करण्यात आला आहे. ठाणे आणि दिवा यांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले असून त्यात 1.4 किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, तीन मोठे पूल, 21 छोटे पूल यांचा समावेश आहे. या मार्गांमुळे मुंबईतील लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीतील तसेच उपनगरीय रेल्वे वाहतुकीतील व्यत्यय मोठ्या प्रमाणात दूर होईल. यासह 36 नवीन उपनगरीय गाड्याही शहरात धावणार आहेत. हा ६ प्लॅटफॉर्म आणि ८ फूट ओव्हर ब्रिज आणि पादचारी पूलांचा विस्तार असलेला रेल्वे मार्ग असेल.
या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.
५ व्या आणि ६ व्या मार्गीकेमुळे होणारे फायदे:
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…