महाराष्ट्र

१६ वर्षांच्या मुलाला वन्यप्राण्याने उचलून नेले, चोवीस तासातील अशी दुसरी घटना…

चंद्रपूर : चंद्रपूर महाऔषणीक केंद्राच्या समोर असलेल्या दुर्गापूर नेरी येथून अल्पवयीन मुलाला वन्यप्राण्याने उचलून नेले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास १६ वर्षांच्या या मुलाला वन्य प्राण्याने उचलून नेल्याने खळबळ उडाली आहे. हा मुलगा दुर्गापूर वॉर्ड नंबर १ मध्ये आदिवासी आश्रम शाळेच्या मागील परिसरात राहत होता. याच परिसरात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. हा वन्य प्राणी वाघ आहे की बिबट्या याचा अद्याप शोध लागलेला नाही.

चोवीस तासातील ही दुसरी घटना आहे. चंद्रपूर वीज केंद्रात काल बुधवारी रात्री भोजराज मेश्राम या कामगाराला उचलून नेले होते. त्यानंतर गुरुवारी पहाटे त्याचा मृतदेह मिळाला होता. वन विभाग मुलाचा शोध घेत आहे. हा संपूर्ण परिसर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला लागून आहे. या परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago