ठाणे

ब्रेकिंग! केतकी चितळे हिची ठाणे कारागृहातून सुटका

ठाणे : मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिची ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे. काल तिला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यानंतर ठाणे पोलिसांनी तिला अटक केली होती. केतकी चितळे हिने पवारांच्या आजारपणावर, दिसण्यावर, आवाजावर अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यामुळे आणि त्यांना भ्रष्ट संबोधल्याच्या कारणावरून तिला अटक करण्यात आली होती. तिला १४ मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यानंतर 18 मे पासून ती न्यायालयीन कोठडीत आहे. तिच्या याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एचएम पटवर्धन यांनी सुनावणी केली. गुन्हे शाखेने आधीच तिच्या जामीन अर्जाला विरोध करत उत्तर दाखल केले होते. मंगळवारी तिच्या जामीन अर्जाला पोलीस विरोध करत नसल्याचे सांगत अतिरिक्त जबाब नोंदवण्यात आला. त्यानुसार काल न्यायालयाने तिला जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.

थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 आठवडे ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

2 आठवडे ago

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…

2 आठवडे ago

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…

2 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…

3 आठवडे ago

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…

1 महिना ago