Staring at women is also a disgrace, Aurangabad Sessions Court verdict
स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचं औरंगाबाद सत्र न्यायालयानं स्पष्ट केलं. अशाच एका प्रकरणात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या रोड रोमिओला औरंगाबाद सत्र न्यायालयानं सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीला एकटक पाहिल्याबद्दल औरंगाबाद सत्र न्यायालयानं दामोदर राबडा या आरोपीला 6 महिने सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला त्रास दिल्याप्रकरणी 2017 मध्ये या आरोपीला अटक करण्यात आली होती. ही मुलगी शाळेत जात असताना आरोपी सतत तिचा पाठलाग करायचा. तसेच तिच्या घरासमोरील बागेत ती सायकल चालवत असताना तिला एकटक पाहत बसायचा. ती मुलगी तिच्या मामाच्या घरी गेली असता तिथंही हा रोड रोमिओ पोहोचला होता. तेव्हा या मुलीच्या मामाने मित्रांच्या मदतीनं आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.
औरंगाबाद पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान आणि ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात एकूण 6 साक्षीदारांनी कोर्टात साक्षी दिल्या. त्यानुसार, स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचं स्पष्ट करत औरंगाबादचे विशेष कोर्टाचे न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दामोदर राबडा या आरोपीला 6 महिने सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या निकालामुळं अशा पीडित मुलींना नक्कीच दिलासा मिळणार आहे, ज्यांना नेहमीच अशा रोड रोमिओंचा त्रास सहन करावा लागतो.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…