महाराष्ट्र

मंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का…

मुंबई : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा-भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांच्या नियुक्तीविषयी कायद्याचे उल्लंघन करत काढलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवलं आहे. पाच नामनिर्देशित नगरसेवकांपैकी केवळ एका नगरसेवकाच्या नियुक्तीविषयी आक्षेप असताना एकनाथ शिंदे यांनी सर्वच नगरसेवकांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. त्यामुळे मंत्र्यांचा ७ डिसेंबर २०२० चा स्थगिती आदेश हा उघडपणे बेकायदा आहे’, असे गंभीर निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश नुकताच रद्दबातल ठरवला.

मंत्र्यांच्या निर्णयाला भाजपचे तीन नगरसेवक व पक्षाचे गटनेते हसमुख गेहलोत यांनी ज्येष्ठ वकील डॉ. बिरेंद्र सराफ व अॅड. तरुण शर्मा यांच्यामार्फत रिट याचिकेद्वारे आव्हान दिले होते. याविषयीच्या सुनावणीअंती न्या. आर. डी. धनुका व न्या. व्ही. जी. बिश्ट यांच्या खंडपीठाने मंत्र्यांचा आदेश रद्दबातल केला.

तसेच ‘मंत्र्यांनी या विषयाचा नव्याने विचार करावा आणि संबंधित तक्रारदार व नगरसेवकांना पूर्ण सुनावणीनंतरच कायद्यानुसार आठ आठवड्यांत योग्य तो निर्णय द्यावा. तसेच तो निर्णय पक्षकारांना कळवावा. आदेश कोणत्याही पक्षकाराच्या विरोधातील असल्यास त्याची अंमलबजावणी पक्षकारांना कळवलेल्या तारखेपासून चार आठवड्यांपर्यंत करू नये’, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण :

महापालिकेत पाच नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी २४ जानेवारी २०२० रोजी सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केली होती. त्यानंतर इच्छुकांच्या कागदपत्रांची छाननी व पात्रता तपासल्यानंतर भाजपचे अजित पाटील, अनिल भोसले व भागवती शर्मा, शिवसेनेचे विक्रम प्रताप सिंग व काँग्रेस लोकशाही आघाडीचे शफिक अहमद खान यांची शिफारस आयुक्तांनी केली. त्यानंतर ७ डिसेंबर २०२० रोजी महापालिकेच्या आमसभेने ठराव करून विक्रम सिंग वगळता अन्य चार जणांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.

विक्रम सिंग हे प्रताप फाऊंडेशनचे अध्यक्ष असून या संस्थेला पालिकेने १३ एप्रिल २०२० रोजी अन्नपदार्थांचे पॅकेट पुरवण्याचे कंत्राट दिलेले असल्याने त्यांना नामनिर्देशित नगरसेवक करता येणार नाही, या कारणाखाली त्यांचे नाव वगळण्यात आले होते. ‘हा आक्षेप चुकीचा असल्याने अन्य चार नगरसेवकांसह विक्रम सिंग यांनाही नगरसेवक म्हणून घोषित करावे’, असा ठराव शिवसेनेने ७ डिसेंबरलाच मांडला असता, तो महापालिकेने फेटाळून लावला. त्यानंतर भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेल्या गीता जैन यांनी तातडीने त्याच दिवशी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली असता, शिंदे यांनी तात्काळ स्थगिती आदेश काढला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ८ डिसेंबर २०२० रोजी नगरविकास सचिवांनी स्थगिती आदेशाची माहिती पालिका व संबंधित नगरसेविकांना पत्राद्वारे कळवली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago