सोलापूर

सोलापूर येथील रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट

सोलापूर : सोलापूर येथील श्री मार्कंडेय रुग्णालयात मध्यरात्री ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये घबराट पसरली आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री मार्कंडेय हॉस्पिटलच्या आवारात ऑक्सिजनचा प्लांट असून प्लांटच्या दोन टाक्या आहेत. त्यापैकी एक टाकी बंद पडलेली आहे. या बंद पडलेल्या टाकीत रासायनिक रिऍक्शन होऊन स्फोट झाला. या स्फोटामुळे टाकीच्या आत असलेली पावडर दूरपर्यंत उडून हवेत धुळीचे लोट उठले. दरम्यान, या प्रकारामुळे रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक प्रचंड घाबरले होते. त्यांची धावपळ सुरु झाली होती. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago