doctor commits suicide in Solapur, body found in a pool of blood in the bathroom
सोलापूर : सोलापुरात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या एका डॉक्टराने स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली आहे. आदित्य नांबीयार असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. तो सध्या सोलापुरात राहत होता, तर मूळचा मुंबईचा असल्याची माहिती मिळाली आहे. आदित्यने अलीकडेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते.अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आदित्यने सोलापूर शहरातील डॉ व्ही एम वैशंपायन शासकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आदित्यने शिकाऊ डॉक्टर म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली होती. आदित्य हा सोलापूर शहरातील नामांकित सोसायटीत भाड्याने घर घेऊन राहत होता. दरम्यान, त्याने आपल्या राहत्या घरात गळा कापून घेत आत्महत्या केली आहे. सोलापुरात डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण ताजे असताना आता ही घटना घडल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मंगळवारी सकाळी आदित्यचा मृतदेह राहत्या घरात बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. बाथरूममध्ये चाकू, कैंची असे साहित्य आढळून आले. आदित्यच्या आत्महत्येबद्दल कळताच त्याच्या मित्रांनी रूग्णालयात धाव घेतली, त्यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या शिकाऊ डॉक्टरने अशाप्रकारे आत्महत्या का केली, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…