महाराष्ट्र

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संताप व्यक्त केला आहे. आतंकवाद्यांनी धर्म विचारून निष्पाप नागरिकांवर गोळीबार करत त्यांचे प्राण घेतले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना सांत्वन दिले. त्यांनी कुटुंबांना आर्थिक मदतीसह सरकारी नोकऱ्याबाबत आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार राज्य मंत्रिमंडळाने आज आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मृत संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहलगाममधील या हल्ल्याने संपूर्ण देशाला धक्का दिला आहे आणि मृतांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात दिलासा देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago