Chief Minister Eknath Shinde
सोलापूर : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला-मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.
विठ्ठलाचे नामस्मरण करत ही दिंडी पायी पंढरपूरकडे रवाना झालेली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी या गावातील रहिवासी या दिंडीमध्ये होते. एकूण 32 जण या दिंडीमध्ये होती अशी माहिती आहे. त्यापैकी 8 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिलांचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. एका चिमुकल्याला देखील यामध्ये जीव गमावावा लागला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी जवळील बायपास रस्त्याजवळ आली होती. याच वेळी मिरजकडून भरधाव वेगात एक कार आली. ही कार थेड दिंडीमध्ये घुसली आणि एकामागून एक वारकऱ्यांना चिरडत गेली. घटनेची माहिती मिळताल पोलिस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…