महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; पुढील तीन दिवस उपचार घेणार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. पुढील तीन दिवस ते रुग्णालयात असणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

या संदर्भात राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. यात ‘शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे त्यांना २ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज मिळेल. व ३ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे पक्षाच्या होणाऱ्या पक्षाच्या शिबीरास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत असं या पत्रात म्हटले आहे. पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करु नये, असंही आवाहन या पत्रात केले आहे.

दरम्यान, बारामतीत दिवाळी पहाट कार्यक्रमात शरद पवार हे सर्वांना भेटले होते. मात्र, त्यानंतर दुसरा दिवशी त्यांचा सोलापूर दौरा होता. तोही रद्द करण्यात आला होता. बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला ते येणार हेाते. मात्र, पवारांचा दौरा रद्द झाल्याने बारबोलेंचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही लांबला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago