selling an eight month old girl 4 arrested incident in virar
विरार : आईचं निधन, वडील सोडून गेले, निरागस चिमुरडीची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार विरार पोलिसांनी सापळा रचुन मुलीची सुखरूप सुटका केली आहे व आरोपींना बेडया ठोकल्या. मुलीला बालसंगोपान केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.
मिळाली माहिती अशी कि, कोरोना काळात चिमुरडीच्या आईचं निधन झालं होतं. तर वडील सोडून गेले होते. आईच्या निधनानंतर चिमुरडी आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. त्या 8 महिन्याच्या या निरागस चिमुरडीची आर्थिक फायद्याकरीता 2 लाखात विक्री करण्यात येणार होती. मात्र त्याआधीच विरार पोलिसांना याचा सुगावा लागला. ज्या ठिकाणी चिमुरडीची विक्री होणार होती तेथे विरार पोलिसांनी सापळा रचला आणि 4 आरोपींना बेडया ठोकल्या. यात दोन महिला तर दोन पुरुष आहेत. विषेश म्हणजे पिपला उर्फ बिपीन उर्फ डॉक्टर जितेन हा डॉक्टर सुध्दा या कटात सामील होता.
आरोपी चौघांनाही वसई न्यायालयानं 16 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या मुलीला बालसंगोपान केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. या कटात नातेवाईक ही सामील आहेत का? याबाबत आता पोलीस तपास करत आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…