A woman was raped by a relative
पुणे : पुण्यातील चिखली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. विवाहितेला ऊसाच्या रसातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ नातेवाइकांना पाठवण्यात आला. या प्रकरणी पीडितेने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या चुलत दिरानेच हे कृत्य केले. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या चुलत दिराने विवाहितेला ऊसाचा रस प्यायला दिला. आरोपीने त्यात गुंगीचे औषध टाकले होते. त्यामुळे ही महिला बेशुद्ध झाली. आरोपीने बेशुद्धावस्थेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर व्हिडिओ देखील काढला. हा व्हिडिओ या आरोपीने महिलेच्या नातेवाइकांना पाठवला. याप्रकरणी महिलेने पोलिसांत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्रारीनुसार, ८ फेब्रुवारीला ही घटना उघडकीस आली. २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान हा प्रकार घडला. आरोपीने व्हिडीओ महिलेचा पती तसेच नातेवाइक आणि मित्रांच्या मोबाइलवर पाठवून व्हायरल केला. त्यानंतर, ही घटना उघडकीस आल्यानंतर महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…