महाराष्ट्र

पंढरपूर मधील बाजारपेठेमध्ये लागलेल्या आगीत काही दुकाने जळून खाक..

पंढरपूर : पंढरपूर मधील बाजारपेठेमध्ये आज पहाटे चारच्या सुमारास  भोसले चौकातील गणपती मंदिराच्या मागील बाजूस दुकानांना अचानक आग लागली. अनेक दुचाकी जाळून खाक झाल्या असून कपड्यांचे गोडावूनही आगीत जळून खाक झाले आहे.  माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी आगीची माहिती मिळताच कार्यकर्त्यांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले.

मिळालेल्या माहिती नुसार, शहरातील बाजारपेठ असलेल्या कर्नल भोसले चौक येथे आज पहाटे चारच्या सुमारास अचानक काही दुकानांना आग लागली. अग्निशामक दलाने दोन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले . पहाटेच्या सुमारास भोसले चौकातील गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेले गॅरेज , कपड्यांच्या गोडावूनला आग लागली होती . यात गॅरेज मधील दुरुस्तीला आलेल्या अनेक दुचाकी जाळून खाक झाल्या असून काशीकपदी समाजाचे कपड्यांचे गोडावूनही आगीत भस्मसात झाले आहे .

माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी आगीची माहिती मिळताच तातडीने नगरपालिकेला निरोप देत कार्यकर्त्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला . वेळीच आगीची माहिती मिळाल्याने लोकवस्तीत आग पसरण्याचा धोका टाळला . ही आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळली नसली तरी पोलिसांनी तपास सुरु केला आहे .

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago