महाराष्ट्र

रियाची कबुली अंमली पदार्थ खरेदी केले; सेवन केले नाही

मुंबई :  रियाला रविवारी सकाळी एनसीबीने बोलावले होते. रिया १२ वाजता एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली पण सेवन केले नसल्याचे सांगितले, या चौकशीनंतर रियाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

एनसीबीने रियाच्या घरी छापा मारला होता. या छाप्यात अंमली पदार्थ जप्त झाले नव्हते. सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाल्यानंतर एनसीबीने तपास सुरू केला आहे. अशा परिस्थितीत अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली तरी हा मुद्दा सिद्ध करणे एनसीबीसाठी आव्हानात्मक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

रियाने रक्त तपासणी करुन घेण्याची तयारी दाखवली आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्यास रक्ताच्या तपासणीत काही आढळणे कठीण आहे. रक्त तपासणीचा अहवाल सुटका करुन घेण्यासाठी वापरणे शक्य आहे.

एनसीबीने मोबाइल चॅटच्या आधारे रियाला प्रश्न केले. चॅट बाबत रियाने उलटसुलट उत्तरं दिली. वेगवेगळी उत्तरं देऊन एनसीबीच्या तपासाची दिशा भरकटावी यासाठी तिने प्रयत्न केला. याआधी शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत या तिघांनी रियासाठी अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली.

रियाकडून पुरेशी माहिती मिळाली नसल्यामुळे तिला सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावल्याचे एनसीबीने सांगितले. अंमली पदार्थ प्रकरणी आतापर्यंत दीपेश सावंत, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडासह सातजणांना अटक झाली आहे. यापैकी दीपेश, शौविक, सॅम्युअल, जैद यांची समोरासमोर बसवून चौकशी सुरू आहे. एनसीबी सोमवारी रियाची अटकेतील आरोपींसमोर बसवून चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago