महाराष्ट्र

राज्यात पुन्हा वाढणार पावसाचा जोर; ११ जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुणे : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजला असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात बुडाली असून काही ठिकाणी जमीनही वाहून गेली आहे. त्यातच आता पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या शुक्रवारपासून (२६ सप्टेंबर) महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पोषक हवामानामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर सोमवारपर्यंत जोरदार पाऊस कोसळणार आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, धुळे, नंदुरबार आणि जळगाव वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांत उद्या पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शनिवारी (२७ सप्टेंबर) राज्यातील ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज (२५ सप्टेंबर) चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवार (२७ सप्टेंबर) रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाट परिसर, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यासाठी पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आयएमडीने दिला आहे. राजस्थानमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र मान्सून सक्रिय आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढणार असून २७ आणि २८ सप्टेंबरला मराठवाडा व कोकणात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तर २८ व २९ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्र, पुणे-मुंबई आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago