पुणे

पुणे विमानतळावर महिलेकडे आढळली विनापरवाना पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे, महिला पोलिसांच्या ताब्यात

पुणे : इंदूरमार्गे दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस विमानात चढताना एका महिला प्रवाशाकडे विनापरवाना पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळल्याने पुणे विमानतळावर खळबळ उडाली. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे राहणारी व बारामती येथे तांत्रिक शिक्षण घेणारी सेविका वैशाली वैभव दोशी (४४) हिला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले. तीन दिवसांत विमानतळावर घडलेली ही दुसरी घटना आहे.

पोलिस उपायुक्त (झोन IV) सोमय मुंढे यांनी सांगितले की, “महिलेच्या बॅगेत सापडलेली बंदुक बेकायदेशीर होती व तिच्या मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे होती. पंचनामा करून व संबंधितांचे जबाब नोंदवल्यानंतर मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एफआयआर नोंदवण्यात आला. रात्री उशिरा वेळ झाल्याने आणि संबंधित व्यक्ती महिला असल्याने अटक न करता नोटीस बजावण्यात आली. शस्त्राचा स्रोत आणि हेतू याबाबतचा तपास सुरू आहे.”

पोलिस सूत्रांनुसार, दोशी यांनी हँडबॅग एका खाजगी विमान कंपनीच्या बॅगेज स्क्रीनिंग काउंटरवर दिली असता, ऑपरेटरला मशीनवर पिस्तूल व काडतुसे दिसली आणि अलार्म वाजवण्यात आला. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी विमानतळ अधिकाऱ्यांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले आणि पोलिसांकडे सोपवले.

विमानतळ सुरक्षा कर्मचारी जयेंद्र शिरोडकर (३३) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, “महिलेच्या जवळ शस्त्राचा परवाना नव्हता. शस्त्राचा स्रोत आणि ते का बाळगले होते, याबद्दल महिलेने कोणतीही माहिती दिली नाही,” असे नमूद केले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हे शस्त्र उत्तर प्रदेशातून आणले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या विमानतळ पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून, बंदुकीचा स्रोत आणि त्यामागील उद्देश उलगडण्यावर भर दिला जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago