पुणे

पुणे : गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक, ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

पुणे : वानवडी परिसरात पोलीसांनी गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. वानवडी भागातील गंगा सॅटेलाईट सोसायटी ते नेताजीनगर रस्ता ह्या भागात वानवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी विठ्ठल चोरमोले आणि अमोल गायकवाड गस्त घालत होते. या दरम्यान, त्यांना माहिती मिळाली की तौफिक रझाक शेख (वय २६, रा. नवाजीश चौकाजवळ, मीठानगर, कोंढवा खुर्द) दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी येत आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून आरोपीला पकडले. झडती घेतली असता त्याच्याकडे ८१० ग्रॅम गांजा आढळला. त्याच्याकडून गांजा, दुचाकी आणि मोबाइल असा अंदाजे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीसांनी सांगितले की, शेखने गांजा कोणाकडून आणला आणि तो कोणाला विक्री करणार होता, ह्या बाबत तपास सुरू आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे व सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, तसेच पोलीस कर्मचारी दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विठ्ठल चोरमोले, विष्णू सुतार आणि अमोल गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीसांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता आहे आणि त्यांनी तपास सुरू ठेवला आहे. ह्या प्रकारामुळे वानवडी परिसरात पोलीस सुरक्षा व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. याशिवाय, गांजा आणि इतर प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभाग सतत गस्त घालत असून कारवाई करत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

7 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago