पुणे

पुण्यात खळबळ! मटणाच्या सूपमध्ये आढळले भाताचे कण, तरुणांनी रागाच्या भरात केला वेटरचा खून

पुणे : किरकोळ कारणावरून तरुणांनी वेटरचा खून केल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील पिंपळे सौदागर येथे घडली आहे. मटणाच्या सूपमध्ये भाताचे कण आढळल्याच्या रागातून थेट वेटरचा खून करण्यात आला. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून सांगवी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश संजय पोस्ते (१९) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे, या घटनेत अजित मुठकुळे (३२) आणि सचिन भवर (२२) हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी विजयराज वाघिरेव आणि त्याच्या साथीदारावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे सौदागर येथील या हॉटेलमध्ये आरोपी विजयराज आणि त्याचा मित्र नेहमी इथे जेवायला येत असत. मंगळवारी देखील हे दोघे या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी ऑर्डर केलेल्या मटणाच्या सूपमध्ये त्यांना भाताचे काही कण आढळले. यामुळे आरोपींना राग अनावर झाला आणि त्यांनी वेटर अजित मुठकुळे, सचिन भवर आणि मंगेश यांना शिवीगाळ केला, त्यानंतर प्रकरण वाढत गेले आणि आरोपींनी लाकडी दांडक्याने तिघाजणांना बेदम मारहाण केली. यात मंगेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago