महाराष्ट्र

लाभार्थी उद्योजकांच्या व्यवसायांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या व्यवसायाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. नवउद्योजकांना त्यांच्या फूड व्हॅन आणि प्रवासी टॅक्सीच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ येथे निवड झालेल्या सहा उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले. यात आशिष जाधव, हर्षाली धनगर, भरत गांजले, रूपाली साखरे, लक्ष्मण शिंदे आणि विनोद राऊत यांचा समावेश होता.

अन्न व्यवसाय आणि प्रवासी वाहतूक सुरू केलेल्या 60 उद्योजकांच्या व्यवसायाचा आज शुभारंभ करण्यात आला. यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात शोभा भंडारे, उत्कर्ष तारी, रूपाली सालेकर, स्नेहा आव्हाड आणि उमेश सोनवणे यांना वाहनाच्या चाव्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासह 14 जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेण्याची सक्ती होती. राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविली आहे. खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकाराने उद्योग विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago