Accident
पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर किवळे- देहूरोड परिसरात भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील चौघेजण दुचाकीवरून जात असताना कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड किवळे ब्रिजवर दुचाकीला कंटेनरने मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी आहेत, जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आई आणि मुलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. देहूरोड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…