पुणे

पुणे : भांडण झाल्यानंतर एकाची गोळ्या झाडून हत्या, २ संशयितांना अटक

पुणे : रक्षक चौकात संध्याकाळी 5 च्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. काही मित्रांच्या गटाने त्यांच्याचबरोबर  असलेल्या एकाला गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर अवघ्या दोन तासांत, पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. सागर शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मूळचा जुनी सांगवी येथील आहे. तर योगेश जगताप असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी घटनाक्रमाची माहिती दिली आहे. सागर शिंदे आणि आरोपी योगेश जगताप हे एकाच गाडीतून रक्षक चौकात आले असता त्यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर आरोपीने पिस्तुल काढून सागरवर गोळी झाडली, त्यात त्याचा मृत्यू झाला. औंध-रावेत बीआरटी मार्गावरील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या नजीकच्या भागात ही संपूर्ण घटना घडली. त्यानंतर, आरोपी वाहनातून खाली उतरून रक्षक चौकाकडे निघाले, तेथे त्यांनी एका मोटारसायकलस्वाराला अडवत त्याची मोटारसायकल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना एकत्रित करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, योगेश जगताप याला पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या अवधीत पकडले. सद्यस्थितीत, या गंभीर कृत्यामागील हेतू अस्पष्ट असून पोलिस चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी २०१३ मध्ये चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात सागर शिंदे याचा खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago