महाराष्ट्र

ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाची डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याशी भेट; महिला सुरक्षा, शोषण यावर चर्चा

मुंबई : ऑस्ट्रेलियाचे उप महावाणिज्यदूत मायकेल ब्राऊन आणि मुंबईतील महावाणिज्यदूत कार्यालयाच्या प्रमुख मॅजेल हाइंड यांच्या शिष्टमंडळाने आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानभवनात सदिच्छा भेट घेतली.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विधानभवन कार्यपद्धती याचबरोबर सर्वपक्षीय आमदारांचे शिष्टमंडळ युरोप दौऱ्यावर जाणार असल्याचीही माहिती दिली. यामध्ये जास्तीत जास्त महिला आमदार आहेत. महाराष्ट्रात स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा, त्यांचे हक्क यासाठी होत असलेल्या कामाची माहिती दिली.

राज्यात प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अखत्यारित असलेल्या महिला दक्षता कमिटीच्या माध्यमातून ज्या सामाजिक संस्थांमधून महिलांविषयक कार्य केले जात आहे त्यांचे समुपदेशनसुद्धा या माध्यमातून सुरू आहे. वाणिज्यदूतांमार्फत त्या संस्थेला निधी उपलब्ध करून दिला तर त्याचा लाभ होईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

पोलीस हेल्पलाईन सुरू केल्याने विविध अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यास प्रशासनाला यश आले आहे. महिलांमध्ये आपल्या हक्काची जागृती येण्यासाठी पोलिसांसाठी ‘स्त्री-पुरुष समानता: पोलीस मार्गदर्शक’ पुस्तिका तयार केली आहे. याच्या माध्यमातून आणि ऑनलाईन बैठकातूनही पिडीत महिला, मुली यांना प्रशिक्षणाद्वारे आधार देण्याचे काम आगामी काळात करण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

येत्या १३ सप्टेंबर २०२३ रोजी विधानभवनामध्ये ‘फेमीनिस्ट फॉरेन पॉलिसी’ यावर कार्यशाळा होणार असून यामध्ये जपान, मेक्सिको, नेदरलँड, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा यांचे वाणिज्यदूत सहभागी होणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या वाणिज्यदूताने सहभागी व्हावे याबद्दल मायकेल ब्राऊन आणि श्रीमती हाइंड यांना डॉ. गोऱ्हे यांनी निमंत्रण दिले. पोलीस मार्गदर्शक पुस्तिका जास्तीत जास्त महिलांपर्यंत प्रसारित होण्यासाठी ऑस्ट्रेलियन महावाणिज्यदूत सहाय्य करेल, असे ब्राऊन यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago