Pune Cantonment Fire Superintendent Prakash Hasbe passed away in an accident
पुणे : पीएमपी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाचे अधीक्षक प्रकाश हसबे यांचा मृत्यू झाला आहे. येरवड्यातून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला. कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट येथील बाजारपेठेला लागलेली आग नियंत्रणात आल्यानंतर ते घरी निघाले असताना हा अपघात झाला.
फॅशन स्ट्रीट मार्केटला आग लागल्यानंतर प्रकाश हसबे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आग नियंत्रणात आल्यावर त्यांनी आढावा घेतला आणि पहाटे साडेचारच्या सुमारास ते घरी निघाले. त्यांनी निघताना दोन तासात परत येतो असं कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं. मात्र, पुणे-नगर महामार्गावर येरवड्यातून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पीएमपी बसने त्यांना उडवले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी पुष्टी केली की आगीच्या घटनेनंतर ड्युटीवरून परतत असताना हसबे यांचा अपघातात मृत्यू झाला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…