Pune: Woman threatened with weapons and sandalwood tree stolen from Prabhat Road area
पुणे : पुण्यातील ७० वर्षे जुन्या चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेण्याची घटना दहा ऑगस्टला पहाटे घडली.उच्चभ्रू आणि वर्दळीच्या अशा प्रभात रस्त्यावरील भारती निवास कॉलनीतील एका बंगल्यात हत्यारे घेऊन आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने धमकी देत ही चोरी केली. या प्रकरणी अनघा परळीकर (वय ४१) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात सात ते आठ जणांच्या टोळक्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ‘श्री ठाकूरधाम’ बंगला येथे राहतात. हा परिसर कर्वे रस्ता आणि प्रभात रस्त्याच्या मधील भागात आहे. घटनेच्या दिवशी सात ते आठ जणांचे टोळके तक्रारदार यांच्या बंगल्याच्या आवारात घुसून चंदनाचे झाड कापत होते. त्यावेळी झाड कापताना झालेला आवाज ऐकून तक्रारदार आणि त्यांचे पती ऍड. रोहित एरंडे दोघे जागे झाले. रोहित यांनी दरवाजा उघडून पाहिले असता, सात ते आठ जणांचे टोळके त्यांना दिसले. टोळक्याकडे शस्त्र असल्याने तक्रारदाराने रोहित यांना घरात बोलावले. त्यानंतर तक्रारदार खिडकीतून बाहेर डोक्यावल्या असता, एका चोरट्याने त्यांना शस्त्र दाखविले. त्यानंतर झाडाचा बुंधा कापून चोरट्यांनी तेथून पळ काढला.
दरम्यान, चोरट्यांनी सोसायटीच्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडून कोणी येऊ नये म्हणून दुचाकी रस्त्याला आडव्या लावून ठेवल्या होत्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. सुमारे १५ ते २० मिनिटांनी पोलिस बिट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत चोरटे झाड घेऊन पळून गेले होते. आवाजामुळे आजूबाजूचे लोक जागे झाले; परंतु चोरांकडे शस्त्र पाहिल्यानंतर त्यांनी एरंडे यांना फोन करून बाहेर येऊ नका, असे बजावले होते.
ऍड. रोहित एरंडे यांनी सांगितले कि, ‘बुंधा चोरून नेलेले चंदनाचे झाड सुमारे १८ वर्षांपूर्वी दोन वेळा कापण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर त्या झाडाला मजबूत असा सहा फुटी उंच चौथरा बांधून घेण्यात आला होता. त्यावर पाच फूट लोखंडी ग्रील करून घेतले होते.’
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…