अहिल्यानगर

नवविवाहित दाम्पत्य मृतावस्थेत आढळल्याने खळबळ, आत्महत्या की घातपात याबाबत तपास सुरु

अहमदनगर : लग्नाला अवघे काही महिने झालेल्या नवदाम्पत्याचे मृतदेह आढळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या जोडप्याचे मृतदेह दोरीच्या सहाय्याने झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, या दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर येथे ही दुर्दैवी घटना घडली. रविवारी (११ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वैभव दत्तात्रेय आमले (वय २२) आणि स्नेहा वैभव आमले (वय २०) या दोघांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नाच्या काही महिन्यानंतरच नवविवाहित दाम्पत्यांने रविवारी सायंकाळी साकूर येथील मुळा नदीच्या जवळील मांगमळीत एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची चर्चा आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या नवदाम्पत्याने आत्महत्या का केली असावी याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. परंतू ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत घारगाव पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि साकूर गावचे ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली. घारगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. यामागील कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या नवदाम्पत्याने आत्महत्या केली की हा अन्य काही प्रकार आहे? आत्महत्या केली असेल तर त्यामागील नेमकं काय कारण? याबाबत अधिक तपास घारगाव पोलीस करीत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago