महाराष्ट्र

पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंना भोवळ, उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली काल पुण्यात पोहचली आहेत. पुण्यात त्यांनी शांतता रॅलीला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांवर आरोपही केले. मात्र, शांतता रॅलीला संबोधित केल्यानंतर मनोज जरांगे यांना भोवळ आली आहे, त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

मनोज जरांगे म्हणाले, शिंदे आणि फडणवीस यांना सांगतो, आमच्या मागण्या पूर्ण करा. मी लढायला तयार आहे. मला चारही बाजूने घेरले आहे आता फक्त उघडे पडू नका फक्त एकजूट राहा. फडणवीस, भुजबळ यांना दंगली घडवायची आहे. मराठ्यांनी ओबीसींच्या अंगावर जाऊ नका आणि त्यांनी पण मराठ्यांच्या अंगावर जाऊ देऊ नका. राज्य शांत ठेवा. मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही. फडणवीस यांनी जेवढं रक्त आमच्या आई बहिनींचे सांडायचे तेवढे सांडले. आता फक्त सगे सोयरेचे अंबलजावणी राहिली आहे. सगे सोयरे आरक्षणासाठी सरकार पाडायचे. 75 वर्ष आम्ही तुम्हाला दिले, 5 वर्ष आमच्यासोबत राहा. काहीही करा एकजूट तुम्ही दाखवा. मुंबईला चक्कर हाणायची का? काही काही जणांना मस्ती आली आहे. आपल्या मराठामध्ये माझ्या सकट 150 उमेदवार आहेत. जर 29 तारखेला उभ करायचं ठरलं तर तुम्हाला जातीसाठी काम करायचं. एक जण उभं करायचं आणि त्याला सगळ्यांनी मिळून निवडून आणायचे.

मराठ्यांनी 100 टक्के मतदान करायचं आहे. 3 महिने काम करा, 5 वर्ष मराठ्यांचे कल्याण होईल. मतदान झाल्याशिवाय तीर्थ क्षेत्राला जायचं नाही. बोगस मतदान बाहेर काढायचं, मतदान केल्याशिवाय शेताकडे जायचं नाही. गिरीश महाजन तुमच्या मतदारसंघात 1 लाख 36 हजार मतदार मराठा आहेत, येवल्या मध्ये सुद्धा 1 लाख 16 हजार मतदार मराठा आहेत. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा मधले सगळे सीट पडणार आहेत. मुंबईत निवडून आणणं जरा जड आहे पण तिथे गेलेले महाराष्ट्रातील मराठा आहेत. पक्षाला आणि नेत्याला बाप मानने बंद करा, मरेपर्यंत तुमच्याशी गद्दरी करणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे, सरकार ने हा कायदा पारिद केला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago