son killed father
धाराशिव : धाराशिवमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाची हत्या केल्याची घटना घडली आहे. भुम तालुक्यातील आंतरगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण आंतरगाव सुन्न झालं आहे. परंडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपाला अटक केली आहे. विजय उर्फ बोधीराम विक्रम गोरे असं आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस जेव्हा आरोपी विजयला अटक करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्याच्या हातात लोखंडी शस्त्र होतं. पोलिसांना बघून आरोपी हे शस्त्र घेऊन त्यांच्या दिशेने धावून आला होता. नंतर त्याने पळ काढला. पोलिसांनी सिनेस्टाईल तीन ते चार किलोमीटरचा पाठलाग करुन पकडले आणि त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी विजय हा आपल्या वडिलांसोबत आंतरगाव येथे राहत होता. 8 ऑगस्ट रोजी विजयाचा त्याच्या वडिलांसोबत शुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्याच क्षणी विजय याने आपल्याच वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने कसला ही विचार न करताना रागाच्याभरात आपल्याच वडिलांची हत्या केली. यानंतर आरोपी विजयने हा गुन्हा लपवण्यासाठी त्याच्या वडिलांचा मृतदेह नदीत फेकून दिला. मात्र दोन दिवसानंतर ही घटना उघड झाली. यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल तीन ते चार किलोमीटरचा पाठलाग करुन विजयला अटक केली आहे. आपण रागाच्याभरात वडिलांची हत्या केली असल्याची कबुली या आरोपी मुलाने पोलिसांना दिली आहे. अधिक चौकशी पोलीस करत आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…