Offensive work in the spa center
पुणे : औंध येथे ओरा स्पा आणि मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाकरीता परराज्य तसेच परदेशातील मुली ठेवून, त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवुन घेतला जात होता. याविषयी १२ एप्रिल रोजी सामाजिक सुरक्षा विभागाला खात्रीशिर बातमी मिळाली. त्यानंतर वरीष्ठांच्या आदेशाने बातमीची खातरजमा करुन, त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिले होते.
त्याप्रमाणे बनावट ग्राहकाला पाठवून खात्री करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी छापा टाकुन, स्पा सेंटरचा मॅनेजर सागर श्याम पवार (वय-३२, रा. गवळीवाडा, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक करण्यात आली. तर मनिष ईश्वर मुथा (रा. कोंढवा, पुणे आणि राहुल जिगजिनी या आरोपींचा शोध सुरु आहे. वरील आरोपी या मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली स्वत:च्या आर्थिक फायद्याकरता महिलांकडून जबरदस्तीने वेश्यागमन करवुन घेत होते. त्यांच्या ताब्यातील दोन परराज्यातील भारतीय महिलांची व थायलंड देशातील अशा एकुण सहा महिलांची सुटका केली आहे.
पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचुन टाकलेल्या छाप्यात एकूण 81, 890 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून, नमुद आरोपींविरुध्द चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, भा.दं.वि. कलम 370, 34 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर, अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उप निरिक्षक सु्प्रिया पंढरकर, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, हणमंत कांबळे, संदिप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण व महिला पोलीस अंमलदार राजश्री मोहिते, मनिषा पुकाळे, अश्विनी केकाण, स्नेहा धुरी यांच्या पथकाने केली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…