Police raid bust of sex racket, arrest one along with three women
पुणे : साळुंके विहार परिसरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा कक्षाने छापा टाकला. या प्रकरणातील पाच आरोपींवर कारवाई करत चार तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.
वानोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साळुंके विहारच्या वरच्या भागात ‘गोल्डन टच स्पा’ नावाचे मसाज सेंटर आहे. या मसाज सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून माहिती गोळा केली. यावेळी पीडित तरुणी मसाजच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे उकळून वेश्या व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर कारवाई करत स्पा मालक, स्पा सहकर्मचाऱ्यांसह डे मॅनेजरसह वानवरी पोलिसात PITA कायद्यान्वये कलम ३, ४, ५ आणि ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलींमध्ये एक छत्तीसगड, एक पश्चिम बंगाल आणि दोन महाराष्ट्रातील आहेत. सदर गुन्ह्यात रोख रकमेसह एकूण १७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्पा मॅनेजर झरना उर्फ पिंकी गौतम मंडल (वय 27, रा. कोंढवा, पुणे, मूळचा पश्चिम बंगाल) आणि मॅनेजर सुमित अनिल होनखंडे (वय 21, रा. कोंढवा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी स्पा मालक रचना संताेष साळुंखे (रहिवासी येवलेवाडी, पुणे), सार्थक लोचन गिरमे (रहिवासी वानवडी, पुणे) आणि लोचन अनंता गिरमे (पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…